‘आता लॉकडाऊन नको, आम्हाला आमच्या नशीबावर सोडून द्या; राजू शेट्टींचा संताप

Raju Shetty

पंढरपूर : राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. मात्र महाविकास आघाडीत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. लॉकडाऊन करायचा असेल तर आधी शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा, ज्यांचे रोजगार जाणार आहेत त्यांना भरपाई द्यावी. तरच लॉकडाऊन करावा. हे जमत नसेल तर आम्हाला आमच्या नशीबावर सोडून द्या. आमचं आम्ही पाहून घेऊ, असा संताप राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी राजू शेट्टी आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लॉकडाऊनचा जोरदार विरोध केला. आधी शेतमालाला किंमत द्या, मगच लॉकडाऊन करा. अनेकांचे रोजगार जाणार आहेत, त्यांना आधी भरपाई देण्यात यावी. ज्यांचा व्यवसाय बुडाला त्यांना भरपाई द्या. मग लॉकडाऊन करा. त्यानंतर आम्ही काहीही म्हणणार नाही. नुसताच लॉकडाऊन करतो म्हणणं योग्य नाही. त्यापेक्षा सरकारनं आम्हाला आमच्या नशीबावर सोडावं. आमचं आम्ही पाहून घेऊ, असं राजू शेट्टी म्हणाले.

लॉकडाउन काळात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. ४ रुपयाचा मास्क ४० रुपयाला विकला विकला जातो. हे नेमकं काय आहे, हे सरकारनं सांगावं. गेल्या वर्षीचे बजेट कोरोनासाठी वापरले त्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्याचा हिशोब सरकारने द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पार पडला. शेट्टी यांच्या सभेला प्रचंड गर्दी होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार टीका केली. महाविकास आघाडीतिल प्रमुख तीनही पक्षाची भूमिका पटत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button