भाजपने गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे : नवाब मलिक

Nawab Malik

मुंबई :- काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लावलेली आणीबाणी ही चूकच होती, असं म्हटले आहे. त्यावरून राष्ट्रवादीने आता भाजपवर (BJP) निशाणा साधला. आता भाजपनेही गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे , अशी मागणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे.

मलिक यांनी विधान भवनाच्या मीडिया हाऊसमध्ये बोलताना ही मागणी केली आहे. ४५ वर्षांनंतर राहुल गांधी यांनी कुठेतरी आणीबाणी ही चूक असल्याचे मान्य केले आहे. आता भाजपनेही गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. जर कॉंग्रेस चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे तर भाजप केव्हा चूक सुधारणार याची माहिती जनतेला द्यावी. दिल्ली दंगलीबाबत काँग्रेसने माफी मागितली होती, आता गुजरात दंगलीबाबत भाजपने माफी मागावी, असेही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : महापालिका पोटनिवडणूकीत भाजपाचा सूफडा साफ, ‘आप’ ४ जागांनी विजयी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER