आता भाजपला आपल्या नेत्यांवरही दबाव टाकावा लागतोय ; राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

Maharashtra Today

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडले आहे. भाजपचा इतर पक्षाच्या नेत्यांवर आजवर दबाव होता परंतु, आता भाजपला आपल्या नेत्यांवरही दबाव टाकावा लागतोय, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर ताशेरे ओढले.

ही बातमी पण वाचा : रामदेवबाबांचे गोबर, गोमूत्र थेरपी बंद करा; नवाब मलिकांची मागणी

ज्याप्रमाणे गुजरातला १ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली तशीच आर्थिक मदत वादळाचा तडाखा बसलेल्या अन्य राज्यांना विशेषतः महाराष्ट्राला दिली गेली पाहिजे’, अशा आशयाचे ट्वीट भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं होतं. पण काही तासानंतर त्यांनी ते ट्विट डीलीट केलं. याआधी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीही याप्रकारे वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना वक्तव्य मागे घेण्यास सांगितले गेले. यावरून मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला .

नेते बोलल्यानंतर शब्द मागे घेतात म्हणजे स्वत:ची मते मांडण्याचा अधिकार भाजप पक्षात नाही, हे यातून सिद्ध झाले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button