आता अंतरिम जामिनासाठी अर्णव गोस्वामी सुप्रीम कोर्टात

Arnab Goswami & SC

नवी दिल्ली : अन्वय नाईक या कंत्राटदारास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीचे प्रधान संपादक अर्णव गोस्वामी यांनी आता अंतिरम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी नोंदविलेला ‘एफआयआर’ रद्द करावा यासाठी गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली. त्या याचिकेवर १० डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी व्हायची आहे. तोपर्यंत आपल्याला अंतरिम जामीन मिळावा यासाठी गोस्वामी यांनी त्याच याचिकेत तातडीचा अर्ज केला. न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. मकरंद  शिंदे यांच्या खंडपीठाने सोमवारी दुपारी ती फेटाळली. गोस्वामी यांनी त्याविरुद्ध लगेच सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली. ती केव्हा सुनावणीस येईल, हे लगेच स्पष्ट झाले नाही.

दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ३३९ अन्वये सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज करण्याचा पर्याय गोस्वामी यांना उपलब्ध आहे, या प्रमुख मुद्द्यावर उच्च न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन फेटाळला. तसेच तसा जामीन अर्ज त्यांनी केला तर सत्र न्यायालयाने त्यावर चार दिवसांत निर्णय द्यावा, असे निर्देशही दिले गेले. त्यानुसार गोस्वामी यांनी अलिबागच्या सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला आहे.

पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी अटक केल्यानंतर अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यानुसार गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. तेथे गोस्वामी व अन्य दोन आरोपींचे रोज तीन तास जाबजबाब घेण्यास दंडाधिकाºयांनी पोलिसांनी परवानगी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER