७ नोव्हेंबरच्या ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’ची कोंडी पंढरपूरमध्ये संचारबंदी

Pandharpur - Maratha Kranti Morcha

पंढरपूर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) ७ नोव्हेंबरला पंढरपुरातून (Pandharpur) आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ६ नोव्हेंबर रात्री १२ वाजल्यापासून ते ७ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत पंढरपूरमध्ये संचारबंदीचे आदेश दिले आहेत.

संचारबंदी काळात पंढरपूर शहरात दोन किंवा दोन पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. पंढरपूर शहराकडे जाणाऱ्या सर्व बसेस बंद राहणार आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आक्रोश आंदोलनात गर्दी होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत.

मराठा क्रांती मोर्चाने पंढरपूर ते मंत्रालय असा पायी आक्रोश मोर्चा घोषित केला आहे. कोरोनाच्या साथीच्या काळाअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरात संचारबंदी लागू केली आहे. महाद्वार घाट ते नामदेव पायरी परिसर, चौफळा ते पश्चिम द्वार परिसर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रदक्षिणा मार्ग, अशा अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक काय भूमिका घेतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

७ नोव्हेंबरला ‘पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा’

७ नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय मराठा समाजाचा पायी ‘आक्रोश मोर्चा’ काढण्याची घोषणा मराठा क्रांती ठोक मोर्चाने मुंबई येथे ३० ऑक्टोबरला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

मोर्चाला ७ नोव्हेंबरला पंढरपुरातून सुरुवात होणार असून २० प्रवास करत आंदोलक मंत्रालयावर धडक देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत हा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिली आहे. हा मोर्चा सरकारला महागात पडल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER