ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदासाठी जोकोवीच – मेद्वेदेव सामना

यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) विजेतेपदासाठी आठ वेळच्या विजेता नोव्हाक जोकोवीच (Novak Djokovic).आणि पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेला दानिल मेद्वेदेव (Daniil Medvedev) यांच्यात लढत होणार आहे.

उपांत्य सामन्यात दानिलने ग्रीसच्या स्टेफानोस सीसीपास याला सरळ सेटमध्ये पराभूत केले. मेद्वेदवने 6-4, 6-2, 7-5 असा विजय मिळवला.

25 वर्षीय दानिलचा हा सलग 20 वा विजय असून यात 10 टॉप टेन खेळाडूंवरील विजय आहेत. गेल्या नोव्हेंबरपासून त्याने टॉप टेनमधील प्रत्येक खेळाडूला पराभूत केले आहे.

तो केवळ दुसऱ्यांदाच ग्रँड स्लॕम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहौचला आहे, याच्याआधी 2019 च्या युएस ओपनची त्याने अंतिम फेरी गाठली होती.

जोकोवीचविरुध्दच्या गेल्या चार पैकी तीन लढती दानिलने जिंकलेल्या आहेत पण ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोवीचचा सामना करणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे कारण ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत तो एकदासुध्दा पराभूत झालेला नाही. यशस्वी झाल्यास मेद्वेदेव हा 2005 नंतर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा पहिला रशियन ठरेल. 2005 मध्ये मरात साफिनने ही स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी त्याने जोकोवीचलाच पराभूत केले होते.

अंतिम फेरी गाठताना मेद्वेदेव म्हणाला की, रविवारी माझ्या एका अतिशय सफल खेळाडूशी सामना होईल. 2019 च्या युएस ओपन फायनलमध्ये राफाला सामोरे गेल्याचा फायदा होईल. तो येथे फायनलमध्ये एकदाही हरलेला नाही त्यामुळे माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही. मला माझा सर्वोच्च खेळ करावा लागेल. तो निश्चितपणे माझ्यापेक्षा अनुभवी आहे पण त्याच्याकडे गमावण्यासारख्या माझ्यापेक्षा कितीतरी अधिक गोष्टी आहेत. अंतिम फेरीत पोहोचल्याचा मला आनंद आहे.

जोकोवीचने उपांत्य सामन्यात अस्लान कार्तासेव्हवर 6-3, 6-4, 6-2 असा विजय मिळवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER