
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) वर्ष २०२१ साठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेवल अकॅडमी परीक्षेसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या परीक्षांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
युपीएससीच्या एनडीए आणि एनए परीक्षांसाठी upsc.gov.in और upsconline.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जानेवारी २०२१ (सायंकाळी ६ पर्यंत) जर कोणत्या तरी कारणाने जर तुम्ही परीक्षा देऊ शकत नाही तर २७ जानेवारी पासून २ फेब्रुवारी दरम्यान युपीएससीच्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही अर्ज मागे घेऊ शकता.
कधी होणार परीक्षा…
इंडियन आर्मी, नेवी आणि एअरफोर्स प्रवेशासाठी १८ एप्रिल २०२१ रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा एनडीएचा १४७ वा कोर्स आणि एनएच्या १०९ व्या कोर्ससाठी असेल. निवड होणाऱ्या उमेदवारांसाठी २ जानेवारी २०२२ पासून कोर्स सुरु होणार आहेत.
नॅशनल डिफेन्स अकॅडमीत आर्मीसाठी २०८, नेव्हीसाठी ४२ आणि एअरफोर्ससाठी १२० पदे आहेत. एकूण पदसंख्या ३७० एवढी आहे.
पात्रता काय…
UPSC NDA Eligibility -फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स विषयासह १२ वी पास.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला