गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १६०० जणांना नोटीसा

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांची कडक उपाययोजना सुरू

EC gets notice on plea challenging jail term for questioning EVMs

औरंगाबाद : विधानसभा निवडणूक शांततेत आणि नर्विघ्नपणे पार पडण्यसाठी शहर पोलिसांनी कडक उपाययोजना करण्यास सुरूवात केली अाहे. गुन्हेगारी पर्श्वभूमी असलेल्या तब्बल १ हजार ६०० जणांना नोटीसा बजावल्या आहेत. निवडणूक काळात गडबड कराल तर खबरदार थेट जेलमध्ये जाल असा इशाराच या नोटिसांच्या मध्यमातून त्यांना दिला आहे. याशिवाय पोलिसांच्या रेकॉर्डवरील ४५५ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारावाई करून त्यांच्याकडून बंधपत्र घेण्यात आले.

गेल्यावर्षी झालेल्या विविध दंगलींमुळे शहराची शांतता धोक्यात आली होती. त्यातच विधानसभेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक शांततेत आणि निर्विघ्न व्हावी याकरता शहर पाेलिसांनी विविध उपाययोजना करण्यात सुरूवात केली. पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार गत निवडणुकांमध्ये गडबड करणारे, मतपेट्या पळवणारे, मतदान केंद्रावर दहशत निर्माण केल्याचा गुन्हा असलेले तसेच मतदारांना प्रलोभन देणारे अथवा धमकावाण्याचे गुन्हे असलेल्या लोकांची यादी पोलिसांकडे आहे.

शिवाय हाणामारी, लुटमार आणि सार्वजनिक, खाजगी मालमत्तेचे नुकसान करणारे आणि चोरी आदि प्रकारचे दोन अथवा दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्या आयुक्तालयाच्या हद्दीतील १ हजार ६०० जणांना पोलिसांनी सीआरपीसी कलम १४९ नुसार नोटीसा बजावल्या आहेत. निवडणुक कालावधीत तुम्ही गडबड करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तुमच्या कोणत्याही कृत्यामुळे शहराची शांतता धोक्यात आली. तर खबरदार, तुमच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल, तसेच पुरावा म्हणून ही नोटीस ग्राह्या धरण्यात येईल, असा इशारा या नोटीसमधून देण्यात आला आहे. पोलिसांनी प्रत्यक्ष कारवाईस प्रारंभ केला आहे.

विष्णुनगर येथील रहिवासी विजय सुभाष बिरारे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर त्याला १ लाख रूपयांचे हमीपत्र देण्याचा आदेश सहायक पोलिस आयुक्तांच्या न्यालयाने दिला होता. मात्र, हमीपत्र न देऊ शकल्याने बिरारेला हर्सुल कारागृहात पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.