एसटी महामंडळात ‘लक्ष्मीदर्शन’शिवाय काहीच होत नाही; भाजपाचा परब यांच्यावर आरोप

Mihir Kotecha - Anil Parab

मुंबई : सध्या मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरचे स्फोटके प्रकरण असो अथवा मनसुख हिरेन मृत्युप्रकरण असो, यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मोठी खळबळ उडाली आहे. आणि अशातच भाजपचे (BJP) आमदार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांनी एसटी महामंडळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोटेचा म्हणाले की, कोविडच्या नावाखाली महाराष्ट्र परिवहन मंडळातर्फे २५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्याची तयारी ठाकरे सरकार करत आहेत. इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनच्या माध्यमातून वार्षिक उत्पन्न पाच हजार कोटींच्या घरात आहे. एप्रिल २०२० मध्ये नव्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. या मशीनसाठी २४ जुलैला परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या उपस्थितीत एकमतानं प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नियम डावलत एका ठरावीक कंपनीला हे टेंडर देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

शक्य तिथे नियम बदलण्यात आले आणि त्यानुसार टेंडर दिलं गेलं. २४ तासांत नियम बदलत नवीन प्रस्ताव बनवून तो पासही करण्यात आला. मंत्री महोदयांच्या शेऱ्यानुसार आधी प्रस्तावावर कार्यवाही करा आणि मग हा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवा, असं लिहिलं गेलं. सर्व नियम डावलत, बेकायदेशीरपणे हे टेंडर काढलं गेलं. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार मिळत नसताना दुसरीकडे मात्र कोट्यवधींचे कॅान्ट्रॅक्ट दिले जात आहेत. या महाविकास आघाडी सरकारमध्ये विनालक्ष्मीदर्शन काहीच होत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

जी फाईल एवढ्या दिवस पडून होती त्या एकाच दिवशी एवढ्या वेगानं लक्ष्मीदर्शनानंच फाईल पास करण्यात आली आहे. साधारण २५० ते ३०० कोटी रुपयांचा हा घोटाळा मंत्र्यांच्या आशीर्वादानेच होत आहे. जर ही निविदा रद्द झाली नाही तर मग याविरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचा इशाराही कोटेचा यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER