ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन ; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

nitesh rane - uddhav thackeray

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात कलम 144 लागू केले आहे . राज्यात उद्या बुधवार 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. मुख्यमंत्र्यांनी ब्रेक द चेनच्या अंतर्गत कोरोनाची साखळी तोडण्याचं जनतेला आवाहन केले . त्यावरूनच भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) हल्लाबोल केलाय. भाजप आमदार नितेश राणेंनी ट्विट करून कोरोनाची साखळी तोडा नव्हे, तर तुमचा मेंदू तपासा, असं टीकास्त्र मुख्यमंत्र्यांवर सोडले . मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांना आता चांगले वाटत असेल, असा टोलाही नितेश राणेंनी लगावला.

दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. तरच रूग्णांची परवड थांबेल”, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button