शिवसेनेनेच नव्हे तर काँग्रेसनेही सीएए, एनआरसी समजून घ्यावा: कुमार केतकर

पुणे :- गुंतागुंतीचा असलेला सीएए, एनआरसी आणि एनपीआर हा विषय केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नाही तर काँग्रेसलासुद्धा समजून घेण्याची गरज आहे. नुसते शिवसेनेला सांगून चालणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले आहे. काँग्रेसमधील काही लोकसुद्धा एनआरसी, सीएए आणि एनपीआरच्या बाजूने बोलले असल्याचे केतकर म्हणाले.

कोरोना ; विमानांना चीनने प्रवेश नाकारल्याने भारतीयांना परत आणण्यात अडथळा

उद्धव ठाकरे यांनी सीएएचा अभ्यास करावा असा सल्ला काँग्रेसने दिला होता. त्यावरुन कुमार केतकरांनी काँग्रेस नेत्यांना टोला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात सीएए, एनआरसी आणि एनपीआरबाबत केलेल्या वक्तव्यावरुन महाविकासआघाडीत धुसफूस होत आहे. केतकर म्हणाले, काही काँग्रेस नेत्यांनी अगोदर एनआरसी, सीएए, एनपीआर आणि कलम 370 ला अगोदर पाठिंबा जाहिर केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एनआरसी, सीएए, एनपीआर यावर आपली बदललेली भूमिका सांगत असल्याचे ते म्हणाले.

एनआरसी, सीएए, एनपीआर याचे विरोधक असणाऱ्यांमध्ये सुद्धा सरकारच्या भूमिकेला समर्थन असणारे लोक आहेत. हे ओळखून तसेच आपल्याला किती विरोध होईल हे पाहून उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका जाहीर केलेली असल्याचे कुमार केतकर यांनी म्हटले आहे. शिवसेना हा कायम भगव्या आघाडीत होता. त्यांना वेगळ्या पद्धतीने समजून सांगावे लागेल. किमान समान कार्यक्रमावर एकजूट असेल तर सरकार पडायचे कारण नाही, असेही कमार म्हणाले. मनसे बांगलादेशींना शोधण्याच काम करते, हे पूर्णतः बेकायदेशीर आहे. त्यांच्यावरच कारवाई व्हायला हवी. पण मनसे जे करते तेच पोलीस आणि अमित शहा यांच्या मदतीने करते आहे, त्यामुळे त्यांना कोण सांगणार, असा टोलाही कुमार केतकरांनी मनसेला लगावला.