ओबीसी समाजाचं कुणाला ऐकायचंच नाही तर खातंही बरखास्त करा – प्रकाश शेंडगे

Prakash Shendge

मुंबई : ओबीसींच्या समस्यांशी कुणाला काही घेणेदेणे नाही असे राज्यातील नेते वागतात. ओबीसींच्या  समस्याही कुणी ऐकून घ्यायला तयार नाहीत तर खातंही बरखास्त करा, अशा शब्दांत ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी संताप व्यक्त केला आहे. धनगर समाजासाठीच्या मागण्यांविषयी  बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले, २१ जुलै रोजी एक बैठक पार पडली.

मेगा भरतीच्या अनुषंगाने ती होती. या बैठकीत अनेक प्रलंबित विषयांवरही चर्चा झाली. यावेळी मेगा भरती सुरू करा आणि ओबीसाला निधी मिळायलाच हवा, अशी मागणी करण्यात आली. धनगर समाजाचा एक  हजार कोटींचा निधीही धूळ खात पडला असून ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी फक्त उपसमिती स्थापन करण्यात आल्याचंही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आलं. त्यावेळी आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचं आश्वासन आम्हाला देण्यात आलं, असं शेंडगे यांनी सांगितलं. तसेच शेंडगे म्हणाले, ओबीसींच्या प्रश्नासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना जाब विचारण्यात आला होता.

मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशाराही देण्यात आला होता. ओबीसींच्या तोंडाला पाने पुसली तर सरकारविरोधात रस्त्यावर उतरावं लागेल, तहसीलदार कार्यालयावर आंदोलन करतानाच रास्ता रोको करण्याचा इशाराही देण्यात आला होता, असं सांगतानाच मंत्री विजय वडेट्टीवार यांनाही भेटून हीच मागणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आमच्या समस्या ऐकायला कुणी तयार नाही. ओबीसी नेत्यांना किंमत दिली जात नाही. हे असंच ठेवायचं असेल तर ओबीसींचं खातं ठेवलं तरी कशाला? हे खातंच बरखास्त करा, असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला. टीव्ही-९शी ते बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER