राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेवर बापू पठारे काय म्हणाले?

Bapu Pathare

मुंबई :- भाजपचे १९ नगरसेवक राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजप नेते आणि वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारेंच्याही (Bapu Pathare) घरवापसीची चर्चा रंगली आहे. ते भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र बापू पठारे यांनी या चर्चा फेटाळून लावल्या.

मी अजित पवारांना (Ajit Pawar) भेटलेलो नाही. त्यांच्याशी माझी चर्चा झालेली नाही. माझ्या विरोधी लोकांकडून मुद्दामहून अशा चर्चा पसरवल्या जात आहेत, असे स्पष्टीकरण बापू पठारे यांनी दिले.

दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नगरेसवक तसेच आजी-माजी आमदार आपल्यासाठी सोयीच्या पक्षाची चाचपणी करत आहेत. मागील काही दिवसांपासून पुण्यातील भाजपचे १९ नगरेसवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यानंतर आता भाजपचे बडे नेते आणि वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारे हेसुद्धा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यासाठी पठारे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणे झाल्याचीही चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER