फेसबुकवरच नाही मग बंदी कशी घातली ? – टी. राजा सिंग

T. Raja Singh

नवी दिल्ली : भाजपाचे आमदार टी. राजा सिंग यांच्यावर फेसबुकने बंदी घातली. द्वेषयुक्त सामग्री प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून फेसबुकने ‘धोकादायक व्यक्ती’ असा त्यांचा उल्लेख केला आहे. यावर टी. राजा म्हणालेत मी एक वर्षपूर्वीच फेसबुक सोडले आहे. मग, फेसबुकने माझ्यावर बंदी कशी टाकली? फेसबुक काँग्रेसच्या दबावाखाली काम करते का ? पुढे, फेसबुक तटस्थ आहे असा बचाव करताना टी. राजा म्हणाले फेसबुकचा भाजपाशी संबंध जोडणं चूक आहे. नवीन अकाऊंट सुरू करण्यासाठी मी फेसबुकला आहे. सर्व नियमांचे पालन करण्याचे आश्वासन देणार आहे.

तेलंगणामधील भाजपाचे एकमेव आमदार असलेले टी. राजा सिंग म्हणाले – एप्रिल २०१९ पासून माझा फेसबुक अकाऊंट नाही. फेसबुकने कारवाई केलेली पेजेस माझ्या समर्थकांनी तयार केले असावेत.

फेसबुकने बॅन केल्याचे म्हटल्याबाबत ते म्हणाले की, “मी याप्रकरणी हैदराबाद पोलीस सायबर क्राइमला ८ ऑक्टोबर २०१८ रोजी पत्र लिहून माझे अधिकृत फेसबुक वेरिफाइड पेजेस ‘हॅक’ झाल्याचे सांगितले होते. यानंतर नवे पेज सुरू केले होते ते एप्रिल २०१९ मध्ये डिलीट केले. मी फेसबुकवरच नाही तर बंदी आणण्याचा प्रश्नच येत नाही”.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER