सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही; मनसेच्या आऊटगोइंगवर बाळा नांदगावकरांचे वक्तव्य

Bala Nandgaonkar - Raj Thackeray

मुंबई : मनसेच्या राजेश कदम (Rajesh Kadam) यांनी शिवसेनेत तर मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं मनसेमध्ये आऊटगोइंग सुरू झाले आहे. यासंदर्भात मनसेचे (MNS) नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना विचारले असता, त्यांनी प्रतिक्रिया दिली. “काहींनी पक्ष सोडल्याने पक्षाला काही फरक पडत नाही. जुने गेले तर नवे कार्यकर्ते उभारी घेतील. सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही.” असं म्हणत मनसेतून बाहेर पडणाऱ्यांवर बाळा नांदगावकर यांनी जोरदार हल्लाबोल केला.  त्यांनी आज मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींकडे प्रतिक्रिया दिली.

राजकारणात हे असं चालतच असते, त्यात नवीन काय आहे? ही नवीन प्रक्रिया आहे का? असा सवालही त्यांनी पत्रकारांना विचारला. अशा काही गोष्टी घडतच असतात. मध्यंतरी मागच्या निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रवादीचे  आणि काँग्रेसचे  किती लोक सोडून गेले. भाजपचे  किती लोक सोडून गेले, आता एकनाथ खडसे नाही का सोडून गेले. पुढे जे काही होईल ते बघा, त्यावर भाष्य करण्यात काही पॉइंट नाही, असंही बाळा नांदगावकर म्हणालेत. पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, त्यावरच प्रत्येक जण निर्णय घेत असतो. आज लगेचच निर्णय घेतो काय? त्यांनी अगोदर कित्येक महिने विचार केलेला असतो आणि नंतर ते निर्णय घेतात. एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जायचं आहे, याचा निर्णय विचार करूनच घ्यावा लागतो.

आता बोलला लगेच गेला असं होत नसतं. आपल्याला घर बदलतानाही विचार करावा लागतो ना, तशीच काहीशी आश्वासनं त्यांना दिलेली असतील. काही वेळेला स्वतःचा वैयक्तिक स्वार्थसुद्धा असतो. काही वेगळ्या अडचणी असतात. तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास ढळला असेल तर तुम्ही इकडे तिकडे जाणार आहात, असा टोलाही बाळा नांदगावकरांनी मनसेतून बाहेर पडणाऱ्या कार्यकर्त्यांना लगावला. तुमचा स्वतःवरती आत्मविश्वास पाहिजे ना. त्याप्रमाणेच तुमच्या नेत्यावरही आत्मविश्वास हवा. माझा नेता खंबीर आहे आणि तो मला पुढे घेऊन जाईल हा आत्मविश्वास तुमच्याकडे नसेल तर उपयोगच नाही. एखादी अशी घटना घडते, ग्रामपंचायतीत आमचे हजारांवर सदस्य निवडून आलेच. मग कसे आले ते निवडून, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER