एफआरपी देवून उपकार केले नाही : राजू शेट्टी यांचा टोला

Raju Shetti

एफआरपी कायदा करुन शेतकऱ्यांवर कोणी उपकार केले नाहीत. गेल्या तीन वर्षात एफआरपीत (FRP) फक्त २१७ रुपये वाढ केली. त्यातुलनेत महागाई, इंधन, वीजदर, मजूरी, खते, वीजदर यामध्ये कितीतरी पटीने वाढ झाली. आतापर्यंत मिळणारी एफआरपी आणि उस उत्पादन खर्चाचा मेळ घालून दाखवा, २० वी ऊस परिषद घेत नाही. तुमचे नेतृत्व मान्य करुन चळचळ चालवतो, असा टोला ऊस परिषदेची गरज काय? असा सवाला उपस्थित करणाऱ्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी लगावला.

जयसिंगपूर येथे झालेल्या १९ व्या ऊस परिषदेत ते बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्यामुळेच एफआरपीचा कायदा झाला. एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. असे असताना राजू शेट्टी यांच्या ऊस परिषद आणि आंदोलनाची गरज काय? असे वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले होते. याचा समाचार शेट्टी यांनी घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER