संपूर्ण अनलॉक नाही, नियम न पाळल्यास कारवाई होईल; वडेट्टीवारांचा इशारा

Maharashtra Today

नागपूर :- तब्बल अडीच महिन्यांनंतर कोरोना निर्बंध आजपासून शिथील झाले आहेत. पूर्णपणे कोरोना संपला नसल्याने नागरिकांना नियम पाळणे अनिवार्य आहे. तसेच लॉकडाऊन पूर्णपणे उठवलेला नाही. फक्त काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत, असे विधान मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील काही जिल्ह्यात अनलॅाकिंगला सुरुवात झाली आहे. मात्र, पूर्णपणे अनलॅाक झालेले नाही आहे. काही निर्बंध शिथिल केले आहेत. एकूण ४३ युनिटपैकी १८ युनिटलाच अनलॅाकिंगची परवानगी मिळाली आहे. पुन्हा संसर्ग वाढल्यास जनता जबाबदार राहील. त्यामुळे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्क न घालता वावरल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वडेट्टीवारांनी दिला आहे.

अनलॉकचे पाच टप्पे
पहिली लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के, तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी.
दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यांदरम्यान असावेत.
तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे ४० टक्क्यांपेक्षा जास्त असतील.
चौथी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड ६० टक्क्यांवर असतील.
पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असतील.

कोणत्या टप्प्यात किती जिल्हे-
पहिल्या टप्प्यात १० जिल्हे – अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ
दुसर्‍या टप्प्यात २ जिल्हे – हिंगोली, नंदुरबार
तिसरा टप्प्यात १५ जिल्हे – मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम
चौथ्या टप्प्यात ८ जिल्हे – पुणे, बुलडाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button