मागणे नाहीच, आहे तेच वाचवण्याचा प्रयत्न; केआरकेने केली मोदी सरकारची टिंगल

मुंबई : या सरकारकडे लोकांचे काहीही मागणे नाही; लोक त्यांच्याकडे आहे ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ट्विट चर्चेत राहणार अभिनेता कमाल आर. खान  (KRK)याने केले आहे.

मोदी सरकारची  (Modi Govt)टिंगल करताना खान याने ट्विट केले – गेल्या ७० वर्षांत अनेक सरकारे आली. ज्यांच्याकडे देशवासीय काहीना काही मागत होते. परंतु यावेळी इतिहासात पहिल्यांदाच असे सरकार आले आहे ज्याच्याकडे कोणी काहीही मागत नाही, उलट त्यांच्याकडे जे काही उरले – सुरले आहे तेच वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

खान नेहमी विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. त्याचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेते आहे. काही तासांत शेकडो नेटीजन्सने यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER