धमकीला भीत नाही – रूपाली पाटील

Rupali Patil - Raj Thackeray

पुणे :- पदवीधर मतदारसंघातील मनसेच्या (MNS) उमेदवार रूपाली पाटील यांना खुनाची धमकी मिळाली आहे. याच्या उत्तरात त्या म्हणाल्या, मी धमकीला भीत नाही.

रूपाली पाटील (Rupali Patil) यांना सातारा जिल्ह्यातून एका तरुणाने फोन करून ‘जिथे असशील तिथे संपवून टाकू. आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस’ अशी धमकी दिली. तपास करून धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला अध्यक्ष रूपाली पाटील मनसेकडून पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी नुकताच सातारा जिल्ह्याचा दौरा केला.

शनिवारी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून फोन आला. ‘मी सातारा जिल्ह्यातून लबाडे बोलत असून, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस. अन्यथा पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू.’ अशी धमकी दिली. पाटील यांचा फोन त्यावेळी त्यांच्या सहकारी महिलेकडे होता. या फोनमुळे ती सहकारी महिला प्रचंड घाबरली. रूपाली पाटील यांना धमकीची माहिती दिली.

रूपाली पाटील रविवारपासून पुन्हा सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा पुरविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER