राऊतांच्या विधानावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,’कोणालाही सल्ला देत नाही’

Sanjay Raut And Supriya Sule

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केले आहे. संजय राऊत यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल काही सल्ला देणार का? असा सवाल उपस्थित पत्रकारांनी सुळेंना केला. यावेळी माझ्याकडे कोणी सल्ला मागितल्याशिवाय मी कोणालाही सल्ला देत नाही, असे सूचक विधान सुप्रिया सुळे यांनी केलं.

उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती, संजय राऊतांना पदावरून हटवा – संभाजी भिडे

संजय राऊतांच्या निषेधार्थ आज (१७ जानेवारी)ला शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगली जिल्हा बंदची हाक दिली आहे. यावर यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत भाजपावर निशाणा साधला आहे. सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र असल्याची शंका माझ्या मनात निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री सांगलीच्या दौऱ्यावर असताना असा बंद पुकारणे चुकीचा आहे. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकविले, तिथे बंद करणे चुकीचे आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

याचबरोबर, आमच्या सरकारसमोर अनेक मोठे आव्हाने उभे आहेत. शेतकरी, नोकरी, अर्थव्यवस्था याकडे प्रामुख्याने लक्ष देणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. चंद्रकांत पाटील यांना आमच्या सरकारवर टीका करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. तो त्यांना संविधानाने दिला आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.