स्पेशल सेशन नव्हे, फक्त फोटोसेशन सुरू; प्रियंकाचा योगींना टोमणा

Priyanka Gandhi & Yogi

लखनौ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी योगींना ट्विट करून टोमणा मारला – उत्तरप्रदेशात गेल्या आठवड्यात महिलांविरोधात अपराधाच्या १३ घटना उघड झाल्यात.

चार  घटनांमध्ये पीडितेची हत्या करण्यात आली होती तर अनेक ठिकाणी महिलांनी आत्महत्या केली होती. महिला सुरक्षेची ही परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. मुख्यमंत्र्यांकडे यावर स्पेशल सेशन करायला वेळ नाही; मात्र फोटोसेशन सुरू आहे! उत्तरप्रदेशातील महिलांच्या विरोधात वाढणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना आणि कायदा सुव्यवस्थेबाबत योगी सरकारवर सातत्याने विरोधी पक्षनेते टीका करत आहेत.

या दरम्यान सोशल मीडियावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोशूटचे फोटो व्हायरल झाले आहेत. प्रियंका गांधींनी ट्विटसोबत एक ग्राफिक्स शेअर केला आहे. ज्यात उत्तरप्रदेशात गेल्या एक आठवड्यात महिलांविरोधात झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी दिली आहे. यात झांशी  सामूहिक बलात्कार, गोंडा अॅसिड हल्ला, चित्रकूटमध्ये बलात्कारपीडितेची आत्महत्या यासारख्या अनेक घटनांचा समावेश आहे.

योगी सरकार बॅकफूटवर

गेल्या काही दिवसांत हाथरस-बलरामपूर गोंडा, झाशी आणि चित्रकूटमध्ये महिला आणि मुलींविरोधात झालेल्या गुन्ह्यांबाबत योगी सरकार बॅकफूटवर आहे. हाथरसच्या  घटनेमुळे योगी सरकार आणि यूपी पोलिसांची प्रतिमा खराब झाली आहे. याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कोर्टाने सरकारला फटकारले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER