साडी नव्हे, बरमुडा नेसा; भाजप नेत्याची ममता बॅनर्जींवर टीका

Dilip Gosh - Mamta Banerjee - Maharastra Today

कोलकाता :- पश्चिम बंगाल निवडणुकीत हाणामारी होत असताना राजकीय नेत्यांनी बोलण्याचे ताळतंत्रही सोडले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर टीका करताना भाजपचे नेते दिलीप घोष (Dilip Ghosh) यांची जीभ घसरली. ममता दीदींनी साडी नव्हे, तर बरमुडा परिधान केला पाहिजे, असे वक्तव्य केले आहे.

काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रचार करत असताना बॅनर्जींच्या पायाला मार लागला. त्यांनी काही दिवस व्हिलचेअरवरून प्रचार केला. यावर भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी आक्षेपार्ह विधान केले. “प्लास्टर केलेले आहे, क्रॅप बँडेज बांधलेले आणि पायवर करून सर्वांना दाखवत आहेत, साडी परिधान केलेली आहे, एक पाय उघडा आणि एक पाय झाकलेला आहे, अशा साडी नेसलेले कधीच कोणाला पाहिले नाही. पायच उघडे ठेवायचे असतील तर साडी तरी का नेसली? बरमुडा का परिधान केला नाही?” असे वक्तव्य दिलीप घोष यांनी केले आहे.

घोष यांच्या विधानावर टीएमसीने संताप व्यक्त केला आहे. टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विट करून घोष यांचा समाचार घेतला. “भाजपच्या अध्यक्षांनी सार्वजनिक सभेत ममता दीदीने साडी का नेसली? असा सवाल केला आहे. त्यांनी आपला पाय दाखवण्यासाठी बरमुडा परिधान केला पाहिजे, असे घोष यांनी म्हटले आणि या माकडांना वाटते बंगाल जिंकतील?” असा सवाल मोईत्रा यांनी केला आहे.

आधीसुद्धा टीका झाली

ममता बॅनर्जी यांना मार लागल्यानंतर टीका झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी ममता दीदींचा मेडिकल रिपोर्ट जाहीर करण्याची मागणी केली. तर, ममता दीदी सहानुभूती मिळवून मते मागण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली होती. मात्र, आज भाजपच्या बंगालच्या अध्यक्षाची जीभ जास्तच घसरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER