राज्यपालांच्या आडून भाजपा राज्य सरकारशी उघड युद्ध खेळत आहे – संजय राऊत

Sanjay Raut-Bhagat Singh Koshyari

नाशिक : भाजपला सत्तेपालून दूर ठेवत राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या सरकारस्थापनेपासूनच राज्यपाल सारखे सारखे बातम्यांमध्ये झळकताना दिसले. शपथविधीच्या दिवसापासून ते आतापर्यंतच्या अनेक प्रसंगातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)विशेष चर्चेत राहिले आहे. त्यातच आताचा सरकारी विमान नाकारल्याची बाबही ठळकपणे चर्चेत आली.

त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपालांबाबत आपले रोखठोक मत मांडले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आडून भाजपा राज्य सरकारशी उघड युद्ध ( Open War) खेळत आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

नाशिक येथे शिवसेना कार्यालयाच्या नूतनीकरण सोहळ्यानंतर त्यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील शीतयुद्ध कधी थांबेल, या प्रश्नावर बोलताना, ‘हे शीतयुद्ध नाही तर उघड युद्ध आहे. त्याकडे फक्त राज्य सरकार आणि राज्यपाल म्हणून पाहू नका. हे युद्ध राज्यपालांच्या आडून भाजपा खेळत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार मंत्रिमंडळाच्या शिफारशी राज्यपालांना बंधनकारक आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याचे टाळून राज्यपाल घटनेची पायमल्ली करीत आहेत, ते केवळ भाजपाच्या राजकीय दबावामुळेच. म्हणूनच हे उघड युद्ध आहे, असे राऊत यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : हे उद्धव ठाकरे आहेत, पुजा चव्हाण प्रकरणात ते कुणालाही पाठीशी घालणार नाही – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER