खडसेंसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक नेते राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत; भाजपच्या गोटात खळबळ

Eknath Khadse-Devendra Fadnavis

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे राष्ट्रवादीत प्रवेश करणारा हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपमध्ये (BJP) खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर खडसेंसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे संकेत आहेत.

राष्ट्रवादीत प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत कोण कोण राष्ट्रवादीमध्ये जाणार याची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जळगावच्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ खडसेंच्या भूमिकेमुळे भाजपच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. गिरीश महाजन यांच्या घरी गुप्त बैठक सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या निवासस्थानावर विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहेत. गिरीश महाजन यांच्या निवासस्थानावर काही निवडक आमदारांसोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस जामनेर येथील ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आज जामनेर येथे आले आहेत. या कार्यक्रमापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्या निवासस्थानावर निवडक आमदारांची बैठक घेतली आहे.

तर दुसरीकडे जामनेरमध्ये देवेंद्र फडणवीस दाखल झाल्यानंतर खडसे समर्थक आक्रमक झाले आहेत. खडसे समर्थकांनी सोशल मीडियावर एकनाथ खडसे यांचा फोटो व्हायरल करत ‘आमचा नेता आमचा अभिमान’ अशा प्रकारे एकनाथ त्यांना समर्थन दर्शवले आहे. त्यामुळे जळगावात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. न्यूज-१८ने हे वृत्त दिले आहे.

ही बातमी पण वाचा : बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती नाही; राष्ट्रवादीचा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER