कोरोनामुळे उत्तर कोरियाचा टोकियो आॕलिम्पिकमध्ये सहभागास नकार?

Tokyo Olympics - Maharastra Today

कोरोनाच्या (Corona) सावटात यंदा तरी आॕलिम्पिक (Olympic) सामने होतील का? झाले तर त्यांना प्रेक्षक उपस्थित राहू शकतील का? जगभरातून येणाऱ्या एवढ्या साऱ्या खेळाडूंसाठी बायोबबलची चोख व्यवस्था होईल का? सामन्यांदरम्यान खेळाडू व अधिकारी बाधित आढळून आले तर काय? असे अनिश्चिततेचे सर्व प्रश्न असताना टोकियो (Tokyo) आॕलिम्पिकला पहिला मोठा धक्का बसला आहे. कोरोनाच्याच भीतीपायी उत्तर कोरियाने (North Korea) टोकियो आॕलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. मात्र उत्तर कोरियाकडून अद्याप अशी कोणतीही अधिकृत सूचना मिळाली नसल्याचे जपानच्या आॕलिम्पिक समितीने म्हटले आहे.

उत्तर कोरियाच्या क्रीडा मंत्रालयाने यासंदर्भात आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, कोरोनाच्या साथीत आपल्या खेळाडूंना सुरक्षित राखण्यासाठी त्यांनी यंदा टोकियो आॕलिम्पिकमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण कोरियाच्या (South Korea) एकिकरण मंत्रालयाने या निर्णयावर खेद व्यक्त करताना म्हटले आहे की, टोकियो आॕलिम्पिक ही आंतर- कोरिया संबंध सुधारण्यासाठी उत्तम संधी ठरेल अशी आशा होती.

जपानच्या आॕलिम्पिक मंत्री तमायो मारुकावा यांनी आताच्या या मुद्द्यावर बोलता येणार नाही असे म्हटले आहे.

2018 मध्ये दक्षिण कोरियात झालेल्या हिवाळी आॕलिम्पिकसाठी उत्तर कोरियाने 22 खेळाडूंचा संघ पाठवला होता. प्योंगचांग येथील त्या सामन्यांमध्ये दोन्ही कोरियाचे खेळाडू एकत्रितरित्या संचलनात सहभागी झाले होते आणि त्यांनी एकत्रित कोरियन उपखंडाचे प्रतिनिधित्व केले होते. महिलांच्या आईस हॉकीतही कोरियाचा संयुक्त संघ सहभागी झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button