उत्तर कोरिया : कोरोनाच्या रुग्णांना गोळ्या घालण्याचे आदेश ?

North Korea Issues Shoot-To-Kill Orders To Prevent Coronavirus, Says US

वॉशिंग्टन : उत्तर कोरियात (North Korea ) कोरोनाची साथ येऊ नये म्हणून सरकारने देशात प्रवेश करणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांना गोळ्या घालण्याचा आदेश दिला आहे. ही  माहिती अमेरिकेच्या दक्षिण कोरियातील सूत्रांनी दिली आहे. दारिद्र्यामुळे उत्तर कोरियाची आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली आहे.

देशात कोरोनाची (Coronavirus) साथ आली तर तिथल्या आरोग्य यंत्रणेला त्या साथीचा सामना करता येणार नाही, अशी स्थिती आहे.

कोरोनाची साथ सगळ्या जगात पसरलेली असताना उत्तर कोरियात मात्र अजूनपर्यंत कोरोनाचा  एकही रुग्ण आढळलेला नाही! चीनमध्ये कोरोनाची साथ आल्याचे वृत्त आल्यानंतर उत्तर कोरियाने जानेवारी २०२० ला चीनशी लागून असलेली सीमा बंद केली. जुलैमध्ये देशात आणीबाणी आणखी कडक केली.

कोरियातील अमेरिकेच्या लष्कराचे कमांडर अब्रामस यांनी ऑनलाईन पत्रपरिषदेत सांगितले की, उत्तर कोरियाने त्यांचा चीनच्या सीमेवरचा बफर झोन दोन दोन किलोमीटरपर्यंत वाढवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER