‘गणपत’ चित्रपटात नोरा फतेही आणि नुपुर सेनन बनणार टायगर श्रॉफच्या नायिका

Nupur Sanon - Nora Fatehi - Tiger Shroff

काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) नव्या चित्रपटाबाबत ‘गणपत’ (Ganpat) बाबत माहिती दिली होती. विकास बहल दिग्दर्शित या अॅक्शन पॅक्ड चित्रपटात टायगर श्रॉफ एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तो मुंबईच्या डॉनची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे.

या चित्रपटासाठी टायगरने बॉक्सिंग शिकण्यास सुरुवात केली आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर यात नायिका कोण असणार याची सगळ्यांना उत्सुकता होती. या चित्रपटातील दोन नायिकांपैकी एका नायिकेच्या भूमिकेसाठी कृती सेननची बहिण नुपुर सेननला (Nupur Sanon) साईन करण्यात आले आहे. तर दुसऱ्या नायिकेच्या भूमिकेसाठी प्रख्यात आयटम डांसर नोरा फतेहीला (Nora Fatehi) साईन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पूजा एंटरटेनमेंटच्या ऑफिसमध्ये नोरा अनेक वेळा दिसली. तेव्हा असे म्हटले जात होते की आयटम गर्ल अक्षयकुमारच्या ‘बेलबॉटम’ चित्रपटात आयटम करण्यासाठी नोराला साईन करण्याचा विचार सुरु आहे. परंतु आता माहिती मिळाली आहे की, नोराला ‘गणपत’ चित्रपटातील नायिकेची भूमिका देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER