अनिवासी तामीळ विभाग! द्रमुकने बदलली ९ मंत्रालयांची नाव

DMK

चेन्नई : तामिळनाडूमध्ये १० वर्षांनी सत्तापालट झाला आहे. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टालिन मुख्यमंत्री झालेत. सत्तेत येताच द्रमुकने ९ मंत्रालयांची नाव बदलली आहेत.

जयललिता आणि करुणानिधी या दोघांच्या अनुपस्थितीत झालेली ही तामीळनाडूची पहिलीच निवडणूक. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. मतदारांनी द्रमुकला कौल दिला. स्टालिन यांनी सरकारच्या ९ विभागांच्या नावात बदल केला आहे.

नाव बदललेले विभाग

कृषी विभाग – कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग
पर्यावरण विभाग – पर्यावरण आणि वातावरण बदल विभाग
आरोग्य विभाग – मेडिकल आणि कुटुंब कल्याण विभाग
मत्स्य व्यवसाय विभाग – मत्स्य आणि मासेमार कल्याण विभाग
कर्मचारी विभाग – कर्मचारी कल्याण आणि कौशल्य विकसन विभाग
माहिती आणि जनसंपर्क – माहिती आणि प्रचार विभाग
सामाजिक कल्याण – सामाजिक कल्याण आणि महिला सक्षमीकरण विभाग
कार्मिक आणि व्यवस्थापन सुधारणा – मनुष्यबळ विकास व्यवस्थापन
अनिवासी भारतीय – अनिवासी तामिळ कल्याण विभाग

याशिवाय मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी पहिल्याच दिवशी राज्यातल्या २.०७ कोटी कुटुंबांसाठी कोविड रिलीफ फंड म्हणून ४ हजार १५३ कोटींची घोषणा केली. ‘आविन’ दुधाच्या किंमती ३ रुपयांनी कमी केल्या आहेत त्यामुळे स्टालिन यांच्या कामाच्या धडाक्याची राज्यात चर्चा सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button