बाबा आढाव माफी मागत नाही तोपर्यंत हमाल पंचायतीशी असहकार : दि पूना मर्चट चेंबर

Baba Adhav

पुणे : हमाल पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी, तोलणार संघटनेच्या आंदोलनात ”मार्केट यार्डातील दोन नंबरची संस्कृती कोरोनापेक्षा भयानक आहे” असे विधान केले होते. डाॅ. आढाव यांच्या या विधानाचा दि पूना मर्चंट चेंबरने निषेध केला व जोपर्यंत बाबा आढाव माफी मागत नाहीत, तोपर्यंत हमाल पंचायत या संघटनेशी कोणतीही चर्चा अथवा वाटाघाटी करणार नाही, असे घोषित केले आहे.

दि पूना मर्चंट चेंबरने याबाबत पत्रक काढले असून यात म्हटले आहे – बाबांचे वय झाल्यामुळे त्यांचा तोल ढासळला आहे, अशी आमची समजूत झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आम्ही काम करतो. त्यांची आमच्यावर देखरेख असते. आमचे सभासद दरवर्षी गूळ- भूसार विभागातून सुमारे १८ कोटी पेक्षा जास्त सेसचा भरणा करतात. दोन नंबर संस्कृतीच्या देखरेखीकरिता सरकारी यंत्रणा सक्षम आहेत. बाबांनी आत्मचिंतन करावे. आपले वारणार कामगार जेथे वाराई व हमाली ८०० ते १००० रुपये होते तेथे वाराई व हमाली दादागिरी व अडवणूक करून दुप्पट किंवा तिप्पट घेतात. दादागिरी करणे, डमीचा उपयोग करणे या गोष्टींचा सर्वप्रथम बाबांनी विचार करायला हवा. व्यापारी काय काम करतात किंवा नाही यात बाबांनी लक्ष देण्याची गरज नाही.

२८ तोलणार हे व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवत होते, असे बाबांचे म्हणणे आहे. तोलणार हे तोलाईची काम सोडून इन्स्पेक्टरचे काम करीत होत का? वरील विधानांसाठी बाबा आढाव जाहिर माफी मागत नाहीत तोपर्यंत दि पूना मर्चटस् चेंबरतर्फे हमाल पंचायतशी कोणतेही सहकार्य व चर्चा करणार नाही, अशी माहिती दि पूना मर्चेटस् चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER