स्वत:ला सेक्युलर म्हणणारे सर्वाधिक धर्मांध : संजय राऊत यांनी सुनावले

Sanjay Raut.jpg

मुंबई : “आपल्या देशात कोणीही सेक्युलर नाही. या देशात कोणीही सेक्युलर होऊ शकत नाही. जे सेक्युलर(Secular) असल्याचे म्हणतात तेच सर्वाधिक धर्मांध असतात. सेक्युलर ही एकप्रकारची शिवी आहे. त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर राजकारणात करण्यात आला आहे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले.

टीव्हीवरच्या एका मुलाखतीत ते म्हणाले – सेक्युलर या शब्दामुळे देशात हिंदू मुस्लीम अशी सरळ विभागणी झाली. तुम्ही केवळ हिंदूंना शिव्या दिल्याने तुम्ही अधिक सेक्युलर असल्याचे म्हटल जाते. हे चूक आहे. मुस्लीम या देशाचेच नागरिक आहेत. परंतु काही राजकीय पक्ष त्यांच्या मतांचे राजकारण करत असतात. त्यामुळे देशाचे नुकसान होते, त्यांचेही नुकसान होते. ते कायम अंधारात राहावे आणि त्यांनी आपल्या मागे यावे अशी त्या पक्षांची इच्छा असते. ज्या दिवशी मतांचे राजकारण थांबेल त्यादिवशी देश पुढे जाईल, असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. केवळ एका निवडणुकीसाठी मुस्लीमांच्या मतदानाचा हक्क काढून घ्या असं ते म्हणाले होते. याचा अर्थ जे मतांचे राजकारण करतात ते यामुळे पळून जातील असा होता. आम्हाला काय म्हणायचे आहे याचा अर्थ समजून घ्या. मतांचे राजकारण या देशात चालू नये.

हीच आमची विचारधारा

आपला देश घटनेच्या आधारावरच चालणारा आहे. सर्वांना समान हक्क मिळाला पाहिजे. या देशात पहिल्यापासून जे राजकारण सुरू आहे त्यात केवळ मुस्लीम धर्माचाच आधार घेतला जातो आहे. त्याला आमचा विरोध आहे. मुस्लीमांनी कुराणवर हात ठेवून, हिंदूंनी भगवतगीतेवर हात ठेवून शपथ घ्यायची, हे त्यावेळी बाळासाहेबांनी बंद करायला सांगितले होते. बाळासाहेब म्हणाले होते, संविधानावर हात ठेवून शपथ घ्यायला लावा. ही आमची विचारधारा आहे आणि तीच राहणार, असे राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : सरकार पाच वर्षे चालणार, उद्धव ठाकरेच राहणार मुख्यमंत्री : संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER