मृत्यूपूर्वी 12 तास मॅराडोनाकडे कुणी लक्षच दिले नव्हते!

Sport news-Maharashtra Today

विश्वविख्यात फूटबॉलपटू दिएगो मॅराडोना (Diego Maradona) याच्या मृत्यूपूर्वी त्याची व्यवस्थित काळजी घेतली गेली नव्हती आणि त्याच्याकडे लक्ष देण्याबाबत संबंधित बेफिकिर होते असे एका अहवालातून समोर आले आहे. मॅराडोनाच्या मृत्यूमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी एक वैद्यकीय समिती नेमण्यात आली होती. त्यासमितीने आपल्या अहवालात हे निष्कर्ष नोंदवले आहेत. गेल्या नोव्हेंबरमध्ये मॅराडोनाचे हृदयगती बंद पडल्याने ब्युनोस आयर्स येथे निधन झाले होते.

मॅराडोनाच्या निधनानंतर अख्खे अर्जेंटिना शोकसागरात बुडाले होते आणि त्याची व्यसनाधिनता आणि ढासळलेली प्रकृती याचा दोष कुणाला द्यायचा अशी संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. 60 वर्षे वयातच मॅराडोनाचे निधन झाल्याने त्याची चौकशी सुरू करण्यात आली होती आणि त्याचे डाॕक्टर व इतर संबधितांची चौकशी करण्यासोबतच त्यांच्या मालमत्तांची तपासणी करण्यात आली होती. मॅराडोना मद्य आणि अंमली पदार्थांच्या अधीन झालेला होता आणि त्याच्या मेंदूवर गेल्या मे मध्येच शस्त्रक्रियासुध्दा करण्यात आली होती. त्यानंतर यंदा मार्चमध्ये त्याच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी न्याय मंत्रालयाने वैद्यकीय पथक नेमले होते. या पथकाला मॅराडोनाच्या आरोग्य चमूने त्याच्याबाबत निष्काळजीपणा दाखविल्याचे आणि योग्य ते उपचार न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

मॅराडोनाने 25 नोव्हेंबरला अखेरचा श्वास घेतला पण त्याच्या 12 तास अत्यवस्थ आणि मरणासन्न अवस्थेत होता, त्याचा हा काळ अतिशय वेदनादायी होता असेही या अहवालात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button