‘लस नाही तर दारू नाही’, ‘या’ जिल्ह्यात दारूच्या दुकानानांवर नोटीस

Maharashtra Today

सैफई : करोनाची साथ रोखण्यासाठी सरकार लसीकरण मोहीम जोरात राबवते आहे. पण, काही लोक लस घ्यायला तयार नाहीत किंवा टाळाटाळ करत आहेत. यावर उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातल्या सैफई गावासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी अफलातून उपाय शोधून काढला. लस न घेणाऱ्यांना दारू द्यायची नाही! असा कायदा केला.

सैफईत दारूच्या दुकानांवर – ‘व्हॅक्सिनेशन करानेवालों को ही मंदिर बिक्री की जाएगी’ असे फलक लागल्यानंतर पत्रकारांनी याबाबत चौकशी केल्यानंतर कळले की, ही नोटीस अतिरिक्त जिल्हाधिकारी हेम कुमार सिंह यांच्या निर्देशानुसार लावण्यात आली आहे!

अलीगड विषारी दारू घोटाळ्यानंतर हेम कुमार सिंह यांनी जिल्हा पोलीस अधिकाऱ्यासह सैफई येथील दारू दुकानांची तपासणी केली. दरम्यान, हेम कुमार सिंग यांनी दारू दुकानांना स्पष्टपणे ‘लस नाही तर दारू नाही’(No vaccine, no alcohol) अशी नोटीस लावण्याच्या सूचना दिल्या.

सैफई येथील मद्य दुकानांच्या कर्मचाऱ्यांनीही याची पुष्टी केली. ते म्हणाले की. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले आहे की, असे केल्याने अधिकाधिक लोक लस घेतील. मात्र इटावा जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी कमल कुमार शुक्ला म्हणाले की, असे आदेश देण्यात आले नाहीत. मात्र, लसीकरणाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळायला हवे, परंतु, दारू खरेदीसाठी लस प्रमाणपत्र देण्याचे आदेश नाहीत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button