‘सीमोल्लंघन’ नाहीच! खडसेंनी घटस्थापनेचीही वेळ चुकवली?

Eknath Khadse - Sharad Pawar

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा असून ते शनिवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, शुक्रवारी त्यांनी पत्रकारांनीच अशा बातम्या पसरवल्याचे बोलल्या नंतर आता पुन्हा नवे तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार असल्याची चर्चा असताना खडसे (Eknath Khadse) यांनीच त्याचे खंडन केले आहे. खडसे म्हणाले, या विषयाबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही. मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत, ते सारे मुहूर्त तुम्हीच म्हणजेच माध्यमांनी ठरविले आहेत, अशा शब्अदांत खडसेंनी माध्सेयमांवरच सगळे उलटले आहे.

यापुर्वीही खडसेंनी जेव्हा जेव्हा भाजपवर उघडपणे नाराजी व्यक्त केली तेव्हा त्यांच्या पक्षप्रवेशांच्या चर्चांना उधाण आलेले पाहायला मिळाले. मात्र, खडसेंनी याबाबत अधिकृत काहीही न सांगता मौन धारण केले होते.

एवढेच काय तर घटस्थापनेच्या मुहुर्तावर खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करून सिम्मोल्लंघन करणार असल्याच्या बातम्याही जोरदार चालल्यात. त्यातही खडसेंना राष्ट्रवादी तेट मंत्रीपदाची ऑपर देणार असेही बोलले जात होते. मात्र, आज वेळ आली, अनेक घरांमध्ये नवरात्रीची घटस्थापनाही झाली मात्र, खडसेंचे सिमोल्लंघन नाहीच. त्यामुळे खडसेंच्या मनात नेमके काय आहे हा प3स्न सातत्याने राज्याच्या राजकारणात विचारला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER