३० जूनपर्यंत कोणत्याही ‘बदल्या’ करू नये; ठाकरे सरकारचा निर्णय

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यातील कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव काहीसा कमी होत आहे. मात्र, तरीही प्रशासनावरील ताण कमी झालेला नाही. अद्यापही परिस्थितीत बदल होण्याची शक्यता नाही. १५ मेपर्यंत असलेला लॉकडाऊनदेखील वाढण्याची शक्यता आहे. राज्यात १५ मेपर्यंत निर्बंध लागू असतील. या कालावधीत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली नाही. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत.

‘नियमित बदल्या’ रोखण्याचा निर्णय ठाकरे सरकारने (Thackeray Government) घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नयेत, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. सरकारच्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या दर तीन वर्षांनी केल्या जातात. मात्र, कोरोना संकटामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांवर ताण आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या न करण्याचा अध्यादेश काढला आहे. पुढील दीड महिना तरी रुटिन बदल्या होणार नाहीत. मात्र, आपत्कालीन बदल्या केल्या जाऊ शकतात.

सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदे भरणे, प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पद भरणे, शासकीय कर्मचार्‍यांविरुद्ध तक्रार मिळाल्यामुळे बदली करणे, अशा निर्णयासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन वेळोवेळी याबद्दल पुढील आदेश काढले जातील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button