
नवी दिल्ली :- पश्चिम बंगालमधील (West Bengal) विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसने घोषणा केली आहे. तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) आगामी विधानसभा निवडणुकीत ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आमदारांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये २७ मार्चला विधानसभा निवडणूक होत आहे. यात एकूण ८ टप्प्यात मतदान पार पडेल, तर निकाल २ मे रोजी लागणार आहे.
काँग्रेस आणि कम्यूनिस्ट पक्षांवर हल्लाबोल
सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तृणमूल काँग्रेसने पक्षाच्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस आणि कम्यूनिस्ट पक्षावर टीका केली. रविवारी मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाने अनेक पक्षांसोबत आघाडी केली. यावर तृणमूल काँग्रेसने आता काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष धर्मनिरपेक्ष राहिले नाही, अशी टीका केली आहे. काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांच्यावरही त्यांनी हल्ला चढवला. तृणमूल काँग्रेसकडून भाजपावर धार्मिक वातावरण बिघडवण्याचा आरोप केला आहे. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तृणमूल काँग्रेसने काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षवरही धार्मिक राजकारण केल्याचा आरोप केला आहे.
निवडणूक आयोगावरही आरोप
ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर तृणमूल काँग्रेसचे बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यांमधील मतदान ३ टप्प्यांमध्ये विभागल्याचा आरोप केला आहे. “मी निवडणूक आयोगाचा आदर करते, मात्र त्यांनी जिल्ह्यांची विभागणी का केली? पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्हा तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणी ३ टप्प्यात मतदान विभागण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोयीनुसार केला का?” असा सवालही बॅनर्जी यांनी केला.
West Bengal Chief Minister and TMC chief Mamata Banerjee to chair election committee’s meeting today at her residence in Kalighat. #WestBengalElections2021
— ANI (@ANI) March 1, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला