तसे विधान केलेच नाही, माझ्या भाषणाचा विपर्यास करण्यात आला, जयंत पाटील यांचा खुलासा

Jayant Patil Maharashtra Today

सांगली : आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या प्रचारासाठी पंढरपुरात शनिवारी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला राष्ट्रवादी कॉग्रेसचे मंत्री जयंत पाटलांनी (Jayant Patil) संबोधित केलं. यावेळी त्यांनी तुमचे चेहरे बघितल्यावर जगात कोरोना नसल्याची खात्री पटली आहे. त्यामुळे मीही मास्क काढूनच बोलतो, असं म्हणत पाटील यांनी चक्क मास्क काढून भाषणाला सुरुवात केली. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झालेली असताना पाटील यांनी मात्र मास्क काढण्याचं समर्थन केल्यानं प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा रंगली होती. त्यावर आता जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे.

जयंत पाटील यांनी माझ्या विधानाचा विपर्यास केल्याचा दावा केला. माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्यात येत आहे. पंढरपूर येथील झालेल्या जाहीर सभेमध्ये समोरच्या गर्दीतील अनेकांनी मास्क घातलेला नव्हता. त्यावर मी इतकेच म्हणालो की, तुमच्याकडे बघून जगात कोरोना नाही असेच वाटते. मात्र असे करू नका. कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. दुपारी तीन वाजता मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत संपूर्ण लॉकडाऊन करायचे, कडक निर्बंध घालायचे याबाबत निर्णय होणार आहे, असे मी बोललो होतो. मात्र, प्रसारमाध्यमांनी दिवसभर माझ्या पहिल्या दोन वाक्यांनाच जास्त प्रसिद्धी दिली. मी नंतर जे बोललो ते प्रसारित केलेच नाही. त्यामुळे माझ्या विधानाबाबत गैरसमज निर्माण झाला, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button