कोरोनाला रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कायम राहणार – मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. आज कोरोनाची रुग्णसंख्या १८ हजारांवर आली आहे. मात्र पहिल्या लाटेतील ही संख्या सर्वोच्च होती. ग्रामीण भागात आता रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी होणे गरजेचं आहे. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन (Lockdown) नाही मात्र निर्बंध कायम राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केली.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात खाली आली आहे. पण आपण अद्यापही कोरोनाच्या नव्या विषाणूवर ताबा मिळवू शकलेलो नाही. अशा परिस्थितीत तिसरी लाट आली तर सर्व कठीण होऊन बसेल. आपण रुग्णालये, बेड्स, ऑक्सिजन सर्व व्यवस्था उभी करण्याता प्रयत्न करु. पण तरीही कोरोनाचा नवा म्युटेट आणि तिसरी लाटचा सामना करणं कठीण होईल. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आपण कोरोनामुक्त गाव असं ठरवलं तर गाव कोरोनामुक्त होईल. प्रत्येकाने घर कोरोनामुक्त करायचं ठरवलं तर आपलं घर कोरोनामुक्त होईल. माझं घर कोरोनामुक्त होईल. पोपटराव पवार आणि दोन तरुण सरपंचांनी त्यांच्या गावातून कोरोना हद्दपार केला. आपल्याला कोरोनाला हद्दपार करायचा आहे. आपल्याला कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवायची आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सध्या कोरोना रुग्ण कमी होत आहेत. त्यामुले निर्बंध उठवण्यात येतील का असा प्रश्न उभा राहतोय. सध्या रुग्णसंख्या ही मागील लाटेच्या सर्वोच्च शिखराएवढी आहे. म्हणजे रुग्णांचा उच्चांक आहे त्याची तुलनात्मक माहिती देणारच आहे. साधारण 17 ते 19 सप्टेंबर 2020 च्या सुमारास आपल्या राज्यात 24 हजार 886 रुग्ण एका दिवसात सापडत होती. आता 26 मे रोजी बघायचं झालं तर साधा 24 हजार 752 रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच म्हणावे तेवढे रुग्ण कमी झालेले नाहीतेय. पहिल्या लाटेच्या उच्चांकात सक्रिय रुग्ण साधारण 3 लाख 1752 होते. आज 26 मे ला तीन लाख 1542 आहेत. म्हणजे मागील लाटेच्या उच्चांकाच्या आपण आज बरोबरीला आहोत. एक मात्र दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण त्यावेळी 78 टक्के होते. आता यावेळा या दिवसांमध्ये प्रमाण 92 टक्के आहे. मृत्यूदरसुद्धा गेल्या वेळेला 2.65 टक्के होता यावेळा तो 1.62 टक्के आहे.

‘फॅमिली डॉक्टरने कोविड आणि नॉन कोविड रुग्ण ओळखावं, रुग्णांची योग्य काळजी घ्यावी’
पावसाळ्यात साथीचे आजार आहेत. त्यात कोरोना आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण ओळखणं अवघड आहे. अशावेळी आपण आप्लाय फॅमिली डॉक्टरकडे जातो. 70 टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे नसतात. पण ते घाबरुन हॉस्पिटलमध्ये जातात. त्यामुळे गरज असलेल्यांना बेड्स मिळत नाहीत. त्यामुळे आपण त्यांना विनंती करतो. हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नाही, अशी विनंती करतो. मृत्यूदर वाढतोय. त्यामागे कारण म्हणजे रुग्ण घरच्याघरी जास्त सिरिअस होतात. त्यामुळे त्यांना वाचवणं अवघड होतं. अशावेळी फॅमिली डॉक्टरची जबाबदारी वाढते. फॅमिली डॉक्टरने कोविड आणि नॉन कोविड रुग्ण ओळखावं. बाधित असल्यास त्याला विलगीकरणात ठेवण्याचा सल्ला द्यावा. फॅमिली डॉक्टरने चांगला प्रतिसाद दिला आहे.

ऑक्सिजनसाठी खूप तारांबळ उडाली. बाहेरच्या राज्याहून ऑक्सिजन आणावे लागत होते. ही संपूर्ण यातायात कशी निभावून नेली ते प्रशासनाचं कौतुक करावं लागलं. हे सगळं फार तारेवरची कसरत होती. आता जो अवतार बदललेला विषाणू आहे त्याच्यावर आपण ताबा आणलेलं नाही. हा विषाणू आता सुटला आणि तिसरी लाट आली तर आपल्याला फार कठीण जाईल. त्यामुळे फार काळजी घ्यावं लागणार आहे. हे कमी होतं की काय आता काळी बुरशी आलेली आहे. राज्यात म्युकोरमायकोसीसचे तीन हजार रुग्ण आहेत. या विरोधात लढण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत आहोत.

लोकांवर निर्बंध लादणे हे सर्वात वाईट, पण सर्वांच्या सुरक्षेसाठी करावं लागतं : उद्धव ठाकरे
राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आतापर्यंत तीन हजार 865 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. आपला महाराष्ट्र सुरक्षित राहावा म्हणून हे सगळं काही करण्यात येत आहे. लोकांवर निर्बंध लादणे हे सर्वात वाईट आहे. जी जनता आपल्यावर प्रेम करते त्यांच्यावर निर्बंध लादणे हे कटू काम आहे. पण सर्वांच्या सुरक्षेसाठी निर्बंध लावावे लागत आहेत. तिसरी लाट आपल्या वागणुकीवर अवलंबून आहे. आताचा जो विषाणू आहे तो झपाट्याने वाढतो आहे. तो झपाट्याने पसरतोय. रुग्णाला बरं व्हायला उशिर लागतोय. ऑक्सिजनची आवश्यकता वाढली. काही जणांना ऑक्सिजनची गरज जास्त लागली. ही वस्तूस्थितीत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान अन्न सुरक्षा योजनेत सरकारने आतापर्यंत 2 लाख 74 हजार मेट्रिक टन धान्याचे मोफत वाटप केलं आहे. शिवभोजन योनजेअंतर्गत एकूण 54 ते 55 लाख थाळ्यांचे मोफत वितरण केलं आहे. संजय गांधी निराधार, दिव्यांग निवृत्ती, विधवा निवृत्ती वेतनमध्ये 850 कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. बांधकाम कामगारांना 155 कोटी रुपयांची मदत केली आहे. फेरीवाल्यांसाठी साधारण 52 कोटींची मदत देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

कोरोना काळात धान्य वाटप केलं. 55 लाख शिवभोजन थाळ्या मोफत दिल्या. फेरीवाल्यांसाठी निधी दिला. आपला महाराष्ट्र सुरक्षित राहण्यासाठी काम करत आहोत. काही निर्बंध लादावे लागतात. त्यापेक्षा वाईट काम नाही. जी जनता आपल्याला आपलं मानते त्यांच्यावर बंधनं लादणं यापेक्षा कटू काम कोणतंही असू शकत नाही. कोरोना लाट खाली यायला लागली आहेत. त्यामुळे निर्बंध काढणार का? असं काही लोक विचारत आहोत. आपली आजची परिस्थिती थोडीशी कमी झाली आहे. पण आजची जी मृतसंख्या ही गेल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्याच्या बरोबरीचं आहे. गेल्यावेळीची लाट ही सणासुदीनंतर आली होती. अजूनही आपण म्हणावं तेवढँ खाली आलोलो नाही. रुग्णसंख्या कमी होत आली असली तरी गेल्यावेळीची सर्वोच्च रुग्णसंख्येच्या बरोबरीची संख्या आहे. रुग्णसंख्या कमी असली तरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात रुग्णसंख्या हल्कीशी वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे प्रमाण आपल्याला थांबवायला हवं.

ही अशी संकटं दरवर्षी आपल्याला त्रास देणार असतील तर आपल्या किनारपट्टीवर कायमस्वरुपी उपायोजना करण्याची गरज आहे. वादळामध्ये वीज खंडित होते. झाडे उन्मळून पडतात. या गोष्टीचा विचार करुन विजेचा पुरवठा भूमीगत करावा लागेल. तसेच काही घरे भूकंपरोधित बांधावे लागतील. या गोष्टीवर आपण काम करणे सुरु केले आहे. या बाबतीत केंद्र सरकारशी बोलणे सुरु केले आहे. मला खात्री आहे केंद्र आपल्याला या बाबतीत मदत करेल.

नैसर्गित आपत्तीविरोधात लढण्यासाठी आता योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता’
नुकसानग्रस्तांना मदतीसाठी जे निकष आहेत ते केंद्र सरकारने बदलायला हवेत. जेणेकरुन लोकांना जास्त मदत करता येईल. तसेच किनारपट्टी परिसरात महत्त्वपूर्ण उपाययोजना करावे लागतील. भूकंपरोधक घरं करावे लागतील. पक्के निवारे बांधण्याची गरज आहे. कारण नैसर्गिक आपत्ती आता वारंवार येत आहेत. याबाबत आपण केंद्र सरकारशी बोलत आहोत. याबाबत केंद्र सरकारला आपल्याला नक्की मदत करेल. आपलं एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. मागील दीड वर्षांपासून तुम्ही काही बंधनं पाळत आहात. या बंधनांचा परिणाम आता दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी गेल्या दशकांतील सर्वात मोठं चक्रीवादळ धडकलं होतं. अशी दुष्ट चक्रीवादळं मागील काही दिवसांपासून धडकत आहेत. एकतर कोरोनाचे संकट त्यानंतर चक्रीवादळ यामुळे फार पंचाईत होते.

तौक्ते चक्रीवादळ आल्यानंतर मी मिनिटा-मिनाटाला माहिती घेत होतो. मी रत्नागिरी सिंधुदुर्गला जाऊन आलो. मी धावता दौरा केला. या वादळाच्या वाऱ्याचा वेग काय अशा सर्व गोष्टींची माहिती घेत होतो. तिथे गेल्यानंतर नुकसानीची कल्पना आली. अनेक ठिकाणी वीज गेली होती. झाडे कोसळली होती. त्यानंतर राज्याने मदत देणे सुरु केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button