चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतसाठी कुठलीही कसर सोडली जाणार नाहीः मोदी

PM Modi -Amphan

नवी दिल्ली :- पश्चिम बंगालमध्ये ‘अम्फान’ या चक्रीवादळामुळे आतापर्यंत 72 लोकांचा मृत्यू झाला असून दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत, अनेक पूल उद्ध्वस्त झाले आहेत आणि सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. कोलकाता व राज्यातील इतर अनेक भागात आपत्तीचे चित्र दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत चक्रीवादळामुळे पीडित लोकांना मदत करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नसल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये शंभर वर्षांनंतर आलेल्या या तीव्र चक्रीवादळानेमातीचे घरे, झाड, शेती, विजेचे खांब पूर्णपणे जमिनीपासून वेगळे केले आहे. ओडिशामध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, समुद्र किनाऱ्यावरील जिल्ह्यातील वीज व दूरसंचार पायाभूत सुविधा कोलमडल्या आहेत.

नरेंद्र मोदी म्हणाले की, चक्रवादळापासून प्रभावित लोकांसाठी सर्व ती मदत करण्यात येईल. मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे, मी चक्रवाती वादळामुळे झालेल्या नुकसानीचे दृश्य बघितले आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याचं दिसत आहे. ही एक कठीण वेळ आहे. संपूर्ण देश पश्चिम बंगालच्या पाठीशी उभा आहे. शीर्ष अधिकारी स्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि पश्चिम बंगाल सरकारसोबत समन्वयाने काम करीत आहेत. प्रभावशाली लोकांच्या मदतीसाठी कुठलीही कमी ठेवली जाणार नाही. असेही पंतप्रधानम्हणाले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला