ना आमदारकीचा थाट, ना कार्यकर्त्यांची गर्दी ; राष्ट्रवादीच्या नेत्याचा ‘लोकल’ प्रवास

Rohit Pawar - Local Train Travel

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणेच आपल्या सहकाऱ्यांशी वागतात, अनेकदा सोशल मीडियातून ते आपलं साधारण वागणं कार्यकर्त्यांसाठी शेअर करत असतात. मग, एखाद्या आजीच्या घरी जाऊन जेवण करणं असेल किंवा सहजच एखाद्या दुकानात जाऊन खेळणी खरेदी करणं असेल. आता, पुन्हा एकदा लोकल प्रवासाने रोहित पवारांनी कार्यकर्त्यांची मने जिंकली आहेत.

मुंबईत कॉलेजला असताना अनेकदा लोकलनं प्रवास करायचो. काल बऱ्याच दिवसांनी एका कामानिमीत्त अंधेरी ते मीरा रोड दरम्यान लोकलनं प्रवास करण्याचा योग आला आणि आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कोरोनाच्या संकटावर मात करून आपल्या मुंबईची ही लाईफ लाईन लवकरच पूर्ववत होईल अशी आशा करतो, असे म्हणत रोहित पवार यांनी आपल्या लोकल प्रवासाचे फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीही रोहित पवार यांनी मुंबईतील बडेवाल्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत लोकलने प्रवास केला होता. त्यावेळी, मी एक दिवस त्यांच्यातला डबेवाला बनल्याचं सांगताना, डबेवाल्यांसोबतच्या एक दिवसाचा अनुभव रोहित यांनी शेअर केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER