पगार नाही : दोन एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये एस टी महामंडळ आणि ठाकरे सरकारला धरले जबाबदार

दोन एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या

जळगाव / रत्नागिरी : मागील ३ महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे जळगाव आणि रत्नागिरीत एक-एक एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employee) आत्महत्या केली. जळगाव एसटी महामंडळात वाहक असलेल्या मनोज चौधरी यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली व ‘ सुसाईड नोट’मध्ये त्यांचा आत्महत्येला एस टी महामंडळ आणि ठाकरे सरकार (Thackeray Government) जबाबदार असल्याचे लिहिले. जळगाव येथे मनोज चौधरी यांच्या आत्मत्येनंतर संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी डेपो बंद ठेवत निषेध केला.

रत्नागिरी येथे पांडुरंग गदडे या एसटी कर्मचाऱ्याचे विवस्त्र अवस्थेत आढळून आले. ही हत्या असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. त्यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. ही हत्या की आत्महत्या हे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर स्पष्ट होईल. पांडुरंग गदडे यांचे नातेवाईक बीड येथून निघाले असून त्यानंतरच पोस्टमॉर्टम केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आत्महत्येला राज्य सरकार जबाबदार – रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)

दिवाळीत बोनस तर सोडाच, पगारही नाही ही गंभीर बाब आहे. केंद्राने जसं पॅकेज दिलं राज्याने तसं पॅकेज दिलं असते तर अशी वेळ आली नसती. या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

चंद्रपूर : घरासमोर बसून आंदोलन
दिवाळी तोंडावर आली असतांना देखील ST कर्मचाऱ्यांचे ४ महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. या कर्मचाऱ्यांना आता अत्यावश्यक सेवेत सामील केल्यामुळे त्यांच्या आंदोलन करण्यावर देखील बंधनं आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आजपासून आपल्या घरासमोर बसूनच आंदोलन करणे सुरू केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER