पोलिसांवर दबाव नाही : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat

नागपूर :- पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात पोलीस दबावाखाली काम करत आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. फडणवीसांचा हा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी फेटाळला  आहे.

बाळासाहेब थोरात आज नागपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांचे पूजा चव्हाण प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांकडे लक्ष वेधले. या आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणाची चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल.” असे मुख्यमंत्री म्हणाले. “पोलीस दबावात काम करतात, अशी पद्धतच नाही. कोणतेही पोलीस दबावाखाली काम करत नाही.” असे थोरात म्हणाले.

फडणवीस काय म्हणाले?

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात पोलिसांची कारवाई दबावात होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. “पोलीस कारवाई करत नाहीत तोपर्यंत त्यांना खुले मैदान आहे. पोलिसांवरील दबाव नाहीसा झाला पाहिजे.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वक्तव्य ऐकून त्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली नसल्याचे वाटते. ठाकरेंना गांभीर्य लक्षात आलेले नाही. ऑडिओ क्लिप्स नीट ऐकाव्या यावरून कुणाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे ते कळेल, असा टोला थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

संजय राठोड नॉटरिचेबल

पूजा चव्हाण प्रकरणात भाजपने नाव घेतल्यापासून वनमंत्री संजय राठोड यांचा फोन गेले तीन दिवस नॉटरिचेबल आहे. त्यांचा शासकीय बंगलादेखील गेले दोन महिने दुरुस्तीमुळे बंद आहे. सध्या ते ‘छेडा सदन’ निवासमध्ये राहात आहेत. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते घरी नसल्याचे त्यांच्या नोकराने सांगितले.

कोरोनाबाबत नवे निर्बंध लागू होणार?

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. यावर थोरात यांनी चिंता व्यक्त केली. नियमात शिथिलता दिल्याने लोक बिनधास्त वागत आहेत. लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर कुठले बंधने घालता येतील, याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असे सांगत थोरात यांनी राज्यात पुन्हा नवे निर्बंध लागू होण्याचे संकेत दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER