दिवसात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही कोल्हापुरला मोठा दिलासा

Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापुरात काल सकाळी १० ते आज रात्री ८ पर्यंत 1762 प्राप्त अहवालापैकी 1696 अहवाल निगेटिव्ह (सिंधुदुर्गचे 66 अहवाल निगेटिव्ह) आहेत. आज जिल्ह्यातील एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. हा मोठा दिलासा आहे.आजअखेर जिल्ह्यात एकूण 378 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 32, भुदरगड- 49, चंदगड- 25, गडहिंग्लज- 13, गगनबावडा- 6, हातकणंगले- 4, कागल- 11, करवीर- 11, पन्हाळा- 20, राधानगरी- 48, शाहूवाडी- 119, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 373 आणि पुणे -1, सोलापूर-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील पाच असे मिळून एकूण 378 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER