ठाकरे सरकारला टार्गेट करण्याचा मुद्दा नाही : पंकजा मुंडे

Pankaja Munde & Uddhav Thackeray

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने एक वर्ष पूर्ण केलं तेव्हा अभिनंदनही केलं, ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारला टार्गेट करण्याचा मुद्दा नाही; मात्र हे जनतेच्या मनातले सरकार नाही. भाजप सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावणार, असे वक्तव्य भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले .

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर जाण्याची खूप वर्षांची इच्छा होती.  व्यावसायिक जीवनात वावरतो, तो चेहराही खराच; मात्र राजकारणात वैयक्तिक विरोध कधी महाराष्ट्राने पाहिलेला नाही. हीच महाराष्ट्राची संस्कृती. त्यामुळे वैयक्तिक जीवनातही आम्ही खेळीमेळीने राहतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात शेतकरी हिताचे सर्वोच्च निर्णय, मोदी शेतकऱ्यांवर प्रेम करणारे नेते आहेत, असेही मुंडे म्हणाल्या .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER