राज्यात एकही रुग्ण नव्या कोरोनाने बाधित नाही, राजेश टोपेंची माहिती

Rajesh Tope

औरंगाबाद : महाराष्ट्रात ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूचा एकही रुग्ण सापडला नसल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 43 नमुन्यात एकही दुसऱ्या स्ट्रेनचा पॉझिटिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. रुग्णाचे स्वॅब पाठवण्यास हलगर्जीपणा झाला असेल तर जाब विचारू. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे ज्याने इंग्लमधून येणाऱ्या सर्व फ्लाईट थांबवल्या असून प्रवाशांना इन्स्टिटय़ूशनल क्वारंटाईन करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत टोपे यांनी ही माहिती दिली.

राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कुठेही नवा कोरोनाचा अवतार आढळला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही. पण तरीही आवश्यक ती काळजी घेणं महत्त्वाचं असून रुग्णाचे स्वॅब पाठवण्यास हलगर्जीपणा झाला असेल तर तुम्ही जाब विचारू शकता असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. नव्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचा दर ७० टक्के आहे. त्यामुळे संसर्ग अधिक वेगाने होऊ शकतो. युरोप अमेरिकेसारखी कठोर लॉकडाऊन व्हायची वेळ येऊ नये, असे वाटत असले तर नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, असे टोपे यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी नागरिकांना अवयव दान करण्याचंही आवाहन केलं आहे. कोव्हिड असलेले लोक आणि कोरोनामुक्त झालेले लोक अवयव दान करू शकतात. त्यामुळे अशा लोकांनी स्वत: पुढे येऊन अवयव दान करावे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER