इंदू मिल कार्यक्रम रद्द यावरून कुणीही राजकारण करू नये; मुख्यमंत्री ठाकरेंनी केली विनंती

इंदू मिल पायाभरणी कार्यक्रम रद्द : मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीने दिले स्पष्टीकरण

CM Uddhav Thackeray- Indu Mill program.jpg

मुंबई : मुंबईतील दादर येथील इंदू मिलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होणार होता. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawatr) यांची प्रमुख उपस्थिती राहणार होती. मात्र, अपुऱ्या नियोजनाअभावी आजचा हा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करावा लागला. या कार्यक्रमाच्या नियोजनातच त्रुटी होती, अशी कबुली राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली. तर लवकरच कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्यामुळे कुणीही हा कार्यक्रम रद्द होण्यावरून राजकारण करू नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा:- विरोधक नाराज झाल्यानेच स्मारकातील पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलला

नवाब मलिक म्हणाले –

कार्यक्रमाचे नियोजन करत असताना आंबेडकर यांच्या वारसांना याबद्दल माहिती दिली गेली नाही. काही नेत्यांना आणि मंत्र्यांनाही याची माहिती दिली नव्हती. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले –

इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. एमएमआरडीएनेदेखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले. मात्र, अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा, असे निर्देश मी दिले आहेत.

त्यामुळे कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये, अशी विनंती त्यांनी केली. दरम्यान, या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याहून सकाळीच निघाले होते. त्यांचा ताफा हा वाशीपर्यंत पोहचला होता. ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्यात आला अशी माहिती कळताच अजितदादांना यू-टर्न घ्यावा लागला. त्यांनी वाशीवरूनच आपला ताफा वळवत पुन्हा पुण्याच्या दिशेनं प्रवास सुरू केला. तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे पायाभरणी कार्यक्रमासाठी हजर राहण्यासाठी इंदू मिलच्या परिसरात पोहचलेही होते. पण, कार्यक्रम रद्द झाल्याचे कळताच त्यांनाही माघारी परतावे लागले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER