‘नोकर भरतीच्या आड कुणी येऊ नये, ; आम्हाला नाही तर कुणालाच नाही ही भूमिका चुकीची – छगन भुजबळ

Chhagan Bhujbal

मुंबई : मराठा समाज (Maratha society) एकीकडे एमपीएससीच्या परिक्षा पुढे ढकलण्यासाठी आग्रही असताना आमि मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकार (Thackeray Govt) कोंडीत सापडलेले असताना महाविकास आघाडीतील मंत्री, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एमपीएससीच्या परिक्षा लांबणीवर टाकण्यासाठी विरोध दर्शवला आहे. नोकर भरतीच्या आड कुणी येऊ नये असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यामुळे आधीच आरक्षणावरून संतापलेला मराठा वर्ग भुजबळांच्या या विधानाने कोणते पाऊल उचलेल हे सांगता येत नाही.

छगन भुजबळ म्हणाले की, आम्हाला नाही तर कुणालाच नाही ही भूमिका चुकीची आहे. ते म्हणाले, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली. आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरती करणं आवश्यक आहे. जेवढ्या परीक्षा पुढे ढकलून तेवढं वय निघून जाईल. ज्यांना नोकऱ्या मिळू शकतात, त्यांना आपण का अडवतोय. भरतीच्या आड कोणी यावं अस मला वाटत नाही.

असा निर्णय झाला तर ओबीसी आणि इतर समाजावर यामुळे अन्याय होईल. नेत्यांनी सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे.

मनाला लागेल अशा गोष्टी टाळता आल्या तर टाळल्या पाहिजे. शिवाजी महाराजांनीदेखील अठरा पगड जातीला सोबत घेऊन लढाई लढली. महाराज हे सगळ्यांचे आहेत. असे भुजबळ म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER