मिठाचा खडा टाकण्याचे काम कुणी करू नये; अजितदादांचे संजय राऊतांना खडेबोल

Ajit Pawar - Sanjay Raut - Maharastra Today

मुंबई : ‘राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अपघाताने गृहमंत्रिपद मिळाले’, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या रोखठोक मध्ये म्हटले आहे . यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत चांगलेच वादंग पेटले आहे . यावर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार हे तीन पक्षांचे आहे. त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये , अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी खडेबोल सुनावले आहे .

आज बारामतीत अजित पवार यांनी कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी संजय राऊत यांना इशारा दिला.

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे शिवसेनेत कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा निर्णय उद्धव ठाकरे घेत असतात. काँग्रेसमध्ये सुद्धा कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा अधिकार हा सोनिया गांधी यांना आहे आणि राष्ट्रवादीमध्ये 1999 पासून मधली 5 वर्ष वगळता सरकारमध्ये काम करतोय. पवार साहेबांना 50 वर्षांचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे कुणाला मंत्रिपद द्यायचे, कुणाला कोणता विभाग द्यायचा, हे राष्ट्रवादीमध्ये तेच ठरवत असतात. इतरांनी वक्तव्य केलं तर समजू शकतो. पण महाविकास आघाडीमध्ये असताना मान्यवरांनी एकमेकांना अडचणीत आणण्याचे वक्तव्य करू नये, असे म्हणत अजित पवार यांनी राऊत यांना बजावले .

तसेच, संजय राऊत यांना चांगले माहित आहे. राष्ट्रवादीमधये शरद पवार हेच निर्णय घेत असतात. शरद पवार यांनी या राज्याचे मुखयमंत्री कोण असावे, हे काँग्रेससोबत आघाडी असताना ठरवले आहे. असे एकंदरीत वातावरणात काम करत आहे. त्यामुळे कुणी मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये, असंही अजितदादांनी राऊत यांना फटकारले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button