एखाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये- संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई : अखेर आज पवारांची नाराजी परमबीर सिंह यांना भोवली आहे. त्यांची या पदावरून उचलबांगडी झाली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या एनआयएच्या अटकेत असलेले मुंबई पोलीस दलातील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या स्फोटके प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दलात ही मोठी घडामोड घडली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एखाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER