डेव्हिड वाॕर्नर जैसा कोई नही!

David Warner

आयपीएलमध्ये (IPL) अर्धशतकी खेळींचा विचार केला तर डेव्हिड वाॕर्नरला (David Warner) तोड नाही. त्याने गुरुवारी किंग्ज इलेव्हनविरुध्द (Kings Elevan) 40 चेंडूत 52 धावा करताना अर्धशतकांचे अर्धशतक पूर्ण केले आणि हा टप्पा गाठणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याच्या या 50 अर्धशतकांच्या वरील खेळींमध्ये चार शतकांचा समावेश आहे.

वाॕर्नरनंतर विराट कोहलीची 42 अर्धशतके आहेत. मात्र वाॕर्नरची 50 अर्धशतके 132 डावातच आहेत तर विराटची अर्धशतके 194 डावात आहेत.

आयपीएलमधील सर्वाधिक अर्धशतके..

50- डेव्हिड वाॕर्नर
42- विराट कोहली
39- सुरेश रैना
39- रोहित शर्मा
38- एबी डीविलियर्स
37- शिखर धवन

या अर्धशतकांच्या अर्धशतकादरम्यान त्याने असा विक्रम केलाय जो इतरांना अवघडच आहे. किंग्ज इलेव्हनविरुध्द त्याने सलग 9 सामन्यांत अर्धशतकांच्यावरील खेळी केली आहे आणि यापैकी 7 खेळी तो कर्णधार असतानाच्या आहेत. विशेष म्हणजे हे सातही सामने वाॕर्नरच्या संघाने जिंकले आहेत. 58, 81, 59, 52, 70*, 51, 70*, 81, 52 अशा त्याच्या या अर्धशतकी खेळी आहेत.

किंग्ज इलेव्हनविरुध्द सलग 9 अर्धशतके झळकावण्याशिवाय त्याने राॕयल चॕलेंजर्स व चेन्नई सुपर किंग्जविरुध्दसुध्दा सर्वाधिक सलग अर्धशतके झळकावली आहेत.

एकाच संघाविरुध्द सर्वाधिक सलग अर्धशतके

9 – डेव्हिड वाॕर्नर वि. किंग्ज इलेव्हन- 2015 ते 20
7- डेव्हिड वाॕर्नर वि. राॕयल चॕलेंजर्स- 2014 ते 16
5- डेव्हिड वाॕर्नर वि. चेन्नई सुपर किंग्ज- 2014 ते 19

आयापीएलमध्ये 30, 40 आणि आता 50 अर्धशतके सर्वप्रथम वाॕर्नरनेच केली आहेत.

आयपीएलमधील वैयक्तिक अर्धशतकांचे टप्पे

10- जेकस् कॕलिस
20- गौतम गंभीर
30- डेव्हिड वाॕर्नर
40- डेव्हिड वाॕर्नर
50- डेव्हिड वाॕर्नर

यासोबतच सनरायजर्सचा कर्णधार म्हणून वाॕर्नरच्या नावावर असा विक्रम लागला ज्याच्या कुणाही कर्णधाराला हेवा वाटेल. कर्णधार म्हणून त्याचा किंग्स इलेव्हनवर हा सलग सातवा विजय होता. या सातही विजयात अर्धशतकी खेळी होतीच आणि अशी कामगिरी करणारा तो आयपीएलमधील एकमेव कर्णधार आहे.

किंग्ज इलेव्हनविरुध्द खेळताना काय जादू होते की काय की अचानक वाॕर्नर फाॕर्मात येतो असा प्रश्न असा किंग्स इलेव्हनसह चाहत्यांना पडला आहे.

यशस्वी कर्णधार म्हणून एखाद्या संघाविरुध्द 100 टक्के सामने जिंकण्यात तो सर्वांच्या पुढे आहे. त्याच्यानंतर सचिन तेंडूलकर आहे ज्याने कोलकाता नाईट रायडर्सवर सहा विजय मिळवले आहेत. आणि स्वतः डेव्हिड वाॕर्नरनेच गुजराथ लायन्सविरुध्दचे पाचही सामने जिंकले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER