नव्याने पक्षात आलेल्यांना पदं दिल्याने कोणीही नाराज नाही – संजय राऊत

Sanjay Raut

पुणे : नव्याने पक्षात येणाऱ्यांना पदं दिली जात आहेत, त्यामुळे मूळ शिवसैनिक नाराज आहेत, या प्रश्नाच्या उत्तरात शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत – सत्ता येण्यासाठी ज्यांचा हातभार लागला त्यांच्याविषयी शिवसैनिकांच्या मनात कटुता असण्याचा प्रश्न नाही, मूळात शिवसैनिक हा शिवसैनिक आहे.

ते म्हणालेत, शिवसेनेत काही वाद नाही. शिवसैनिक हा शिवसैनिक आहे. उदय सामंत यांना शिवसेनेत येऊन १० वर्ष झालेत. शंकरराव गडाख राजेंद्र यड्राववकर हे निवडणुकीत आले, पण त्यांनी निवडून येण्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा घेतला होता, आता शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे तर येड्रावकर सहयोगी सदस्य आहेत. कधीकधी राजकारण आणि सत्ता स्थापनेची गरज असते त्यातून असे निर्णय घेतले जातात. मूळात सत्ता येणे महत्त्वाचे आहे, सत्ता येण्यासाठी ज्यांचा हातभार लागला त्यांच्याविषयी शिवसैनिकांच्या मनात कटुता असण्याचा प्रश्न नाही, मूळात शिवसैनिक हा शिवसैनिक आहेत.

मी गेल्या ३० वर्षापासून सामनाचं संपादक पद सांभाळतो, त्याआधीपासून शिवसेनेशी जोडलो आहे, कोणतेही पद मिळावं म्हणून राजकारणात आलो नाही, शिवसेनेची चळवळ मराठी माणसासाठी उभी राहिली. ही चळवळ महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले, राजकारणात काहीही ठरवून आलो नाही. ठरवून आले ते टिकत नाहीत. विचारांशी प्रामाणिक नाहीत ते खुर्च्या बदलत असतात त्याने काही साध्य होत नाही असे राऊत म्हणालेत.

ही बातमी पण वाचा : सरदार पटेल जयंती निमित्तच्या ट्विटमधून कंगनाची गांधी, नेहरूंवर टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER